नुकताच तुर्की हा अवकाश संशोधनासाठी 'आर्टेमिस करारांमध्ये (Artemis Accords)' सामील होणारा ७१ वा देश ठरला आहे.

ठळक मुद्दे:

  • चंद्र, मंगळ आणि त्यापुढील अवकाशाचे सुरक्षित व शांततापूर्ण अन्वेषण (संशोधन) करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, अमेरिकेच्या (USA) नेतृत्वाखालील 'आर्टेमिस करारां'मध्ये सामील होणारा तुर्की हा अधिकृतपणे ७१ वा देश बनला आहे.
  • वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) येथील 'नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन' (NASA) च्या मुख्यालयात आयोजित समारंभात तुर्कीचे उद्योग आणि तंत्रज्ञान मंत्री मेहमत फतिह कासिर यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
  • महत्त्वाचे तपशील: पश्चिम आशियातील ७ वा देश: संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, बहरीन, ओमान, जॉर्डन आणि इस्रायल यांच्यानंतर या आराखड्यात सामील होणारा तुर्की हा पश्चिम आशियातील ७ वा देश ठरला आहे.

आर्टेमिस करारांविषयी महत्वपूर्ण माहिती:

  • करार सुरुवात वर्ष: नासा (NASA) आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागामार्फत संयुक्तपणे २०२० मध्ये 'आर्टेमिस करार (Artemis Accords)' सुरू करण्यात आले होते.
  • मुख्य उद्देश: स्वाक्षरी करणाऱ्या देशांमधील द्विपक्षीय आणि बहुपक्षीय अवकाश सहकार्य वाढविणे या मुख्य उद्देशाने हे करार सुरू झाले.
  • आराखडा निश्चितीकरण: सदर करारांच्या माध्यमातून १९६७ मध्ये स्वाक्षरी झालेल्या 'बाह्य अवकाश करारामधील (Outer Space Treaty)' मुख्य जबाबदाऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी एक आराखडा सुनिश्चित करण्यात आला.
  • करार वैशिष्ट्य: आर्टेमिस करार हे शांततापूर्ण, सुरक्षित तसेच शाश्वत नागरी अवकाश संशोधनाला दिशा देण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.